(Amruta Fadnavis ) मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिने केला होता. याप्रकारामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे.
या प्ररकणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.
काही दिवसांपूर्वीच मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक…!
अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेर गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.
अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Ajit Pawar | सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले, म्हणाले