मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे “आज मैं मूड बना लिया” हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्या नेहमी आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून त्या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. कधी त्यांची गाणी प्रेक्षकांना आवडतात. तर, कधी त्यांच्या गाण्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी त्यांच्या गाण्याची आवड कायम जपली आहे.
Excited to meet y’all & make you #JoinTheBrideTribe !
Song releasing tomorrow…..Stay tuned.
Let the celebrations begin!
@TSeries #BhushanKumar @Avinash_galaxy @MehakGhai23 @meetbros @kumaarofficial @Ad7777Adil #teaser pic.twitter.com/N1rVib6rRe— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 5, 2023
“आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी डान्सही केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या गाण्यातून वेगळा अनुभव पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. त्यांच्या गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये अमृता फडणवीस गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या आणि बदललेल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अखेर हे गाणे रिलीज झाले आहे. आणि या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला आहे.