Amravati News : अमरावती : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करत, आपल्यावर केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी जेव्हा रुग्णालयात होतो, तेव्हा मला हालता येत नव्हतं. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन यांच्या हालचाली सुरूच होत्या. कोणीतरी हुडी घालून फिरत होतं. भेटीगाठी घेत होते, ते नेमके कोण होते, याचे उत्तर द्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केलं.
हल्ली खोक्यातून सरकारचा जन्म होतो
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. माझ्यामुळे अनेकांच्या कंबरेचे आणि गळ्याचे पट्टे निघाले. सर्वजण फिरायला लागले. घराबाहेर पडले. (Amravati News) नाही तर घरातच बसून होते… असे विधान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले होते. याला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे म्हणाले की, पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला येत होते. हल्ली खोक्यातून सरकारचा जन्म होतो. तुम्ही मतदान कुणालाही करा, सरकार आमचंच येणार… हे लोकशाहीसाठी घातक आहे. पैशाचा माज आणि दमदाटी करून आजकाल कोणीही सत्तेवर येऊ शकते, अशी स्थिती आहे. हे चित्र निराशाजनक आहे.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी नवनीत राणा यांच्यावरही कडाडून टीका केली. काही लोकांना काही काळापुरतं महत्त्व मिळतं. नंतर ते आठवणीत राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. (Amravati News) असं म्हणत राईट टू रिकॉलचा अधिकार दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यावर देशाने विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनीही ही मागणी केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपसोबत ठरलेल्या अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो. ते माझे स्वप्न कधीच नव्हते. (Amravati News) शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असे वचन मी वडिलांना दिले होते. अमित शाह यांच्याशी बोलणेही झाले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!