Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambedkar Jayanti 2023 : शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना डॉ आंबेडकर जयंती महोत्सवात ‘प्रवेश बंदी’…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 11:33

(Ambedkar Jayanti 2023) :  मुंबई : विविध विद्यापीठे आणि बार्टीने पात्र ठरवलेल्या अनुसूचित जातीच्या ८६१ संशोधकांना सरसकट फेलोशिप येत्या १४ एप्रिलआधी देण्यात यावी. अन्यथा या अन्यायाविरोधात आवाज न उठवणारे राखीव मतदारसंघातील सर्वपक्षीय आमदार आणि शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti 2023) यांच्या जयंती महोत्सवात ‘प्रवेश बंदी’ करावी, अशी हाक संविधान समर्थक दलातर्फे राज्यातील दलित जनतेला देण्यात आली आहे.

राखीव मतदारसंघातील अनुसूचित जाती- जमातींचे एकूण ४७ आमदार आणि शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचे हे आवाहन प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव आणि सतीश डोंगरे यांनी संविधान समर्थक दलाच्या एका पत्रकाद्वारे आज केले.

‘सारथी’ आणि ‘ म्हाज्योती’ प्रमाणे बार्टीनेसुद्धा २०१८ सालात अनुसूचित जातीच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४०८ आणि २०२०- २१ मध्ये ५१७ संशोधकांना फेलोशिप यापूर्वी दिलेली आहे. असे असतानाही यावेळी केवळ २०० संशोधकांनाच फेलोशिप देण्याची आणि ६०० च्यावर संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएचडीसाठी २०२१ या वर्षात नोंदणी झालेल्या ८६१ संशोधकांना बार्टी या संस्थेने पात्र ठरवले आहे. मात्र सरकार निधीच्या कमतरतेचे कारण पुढे करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘ठेंगा’ दाखवला आहे. ‘आमच्याकडे फक्त २०० विध्यार्थ्यांपुरताच निधी आहे, असे राज्य सरकार सांगत आहे.

या अन्यायाविरोधात शेकडो संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. पोलीस संध्याकाळी रोज त्या विद्यार्थ्यांना हुसकावून लावत आहेत. बुद्ध विहारांमध्ये आश्रय घेत गेला महिनाभर त्यांचे आंदोलन सुरू आहे.

विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली…!

फेलोशिपसाठी उपाशी तपाशी संघर्ष करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चालली असून काही जणांना रुग्णालयाची वाट धरावी लागली आहे, असे सांगून प्रा. रमेश जाधव म्हणाले की, एखाद्या विद्यार्थ्याचे काही बरे वाईट झाले तर परिस्थिती चिघळू शक्यता नाकारता येत नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Indapur News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून भाजपचा ''यु टर्न''

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.