Amaravati News : अमरावती : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी (ता. ११) जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना अशाच प्रकारचे फोन आले. कालपासून सुरू झालेले हे धमकीसत्र अद्याप सुरूच असल्याचे दिसत आहे. आज बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. या धमकी सत्रांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ!
रवी राणा यांना धमकवताना, तू सतत आमच्या विरोधात कसा काय बोलू शकतोस, असे म्हणत आता हे सगळं थांबव नाही तर तुला संपून टाकतो, अशी दमदाटी करण्यात आली. तू महाराष्ट्रभर फिरणं बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचं बरं-वाईट करीन. अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको. तुमच्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्ला करणार आहेत. तुम्हाला आम्ही सोडणार नाही. (Amaravati News)आमच्या विरोधात कसे काय बोलता, हे आम्ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत, तशी सुपारी मिळाली आहे, असं तो तरूण सांगत होता. (Amaravati News) एका तरूणाला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. या तरुणाने आपल्या रडारवर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते, अशी धक्कादायक कबुली दिली होती.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी मंगळवारी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली होती. (Amaravati News) काल सुरू झालेले हे धमकीसत्र अद्याप सुरूच असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Amaravati News : भाजपच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले