(Ajit Pawar) पुणे : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायचं? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
सही झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही..!
अनेक ठिकाणी दगडासारख्या गारा पडल्या आहेत. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सांगितले पाहिजे की पंचनामे करुन त्यावर सही करा. सही झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असेहि अजित पवार म्हणाले.
राज्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. सरकार मात्र ठोस भूमिका घेत नसल्याचे अजित पवार म्हणाले. यानंतर विपरोधकांनी शेती प्रश्नावरुन सभात्याग केला. सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळं पंचनामे होत नाहीत असं राज्य सरकार सांगत आहे. पण राज्यात शासनाचे सगळे कार्यक्रम सुरु आहेत. त्या सर्व कार्यक्रमांना कर्मचारी हजर राहत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार म्हणाले.
शासकीय कार्यक्रमाला कर्मचारी हजर राहतात मग शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला कर्मचारी का हजर राहत नाहीत असा सवाल सुनिल केदार यांनी केला. ही शासनाची दुटप्पी भूमिका असल्याचे केदार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. आज आणि उद्यापर्यंत पंचनामे पूर्ण होतील असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे : अजित पवार
Pune Fraud News | पुणे : विजय वर्ल्डच्या मालकावर फसवणूकीचा गुन्हा; १८ लाखांच्या फसवणूकीचा आरोप!