Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. असे असताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता पत्राची चर्चा चांगली रंगली आहे.
अजित पवारांनी नेमके पत्रात काय म्हणाले असावेत, यावर तर्कवितर्क लावले जात होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजित पवारांनी काही मागण्या केल्या आहेत.
नवी मुंबईच्या खारघर येथे काल पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला 22 लाख श्रीसेवकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान आतापर्यंत १५ श्रीसेवकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
सरकार निर्मित आपत्ती….
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 22 लाख श्रीसेवकांनी हजेरी लावली. अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात काही श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात, ही सरकार निर्मित आपत्ती असल्याचा आरोप केला आहे. मृत्यांच्या नातेवाईकांना जाहीर केलेल्या ५ लाखांच्या मदतीत वाढ करत 20 लाखांची मदत करावी. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिश यांच्या समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.