Ajit Pawar मुंबई : दिग्गज नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. यापुढं कुठलीही निवडणूक लढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पवार यांच्या जीवनावरील ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी इतर नेत्यांपेक्षा वेगळं मत मांडलं आहे.
पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. सगळ्यांनी घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांनी तर शरद पवारांनी निर्णय मागे घेतला नाही तर आपणही राजीनामा देऊ, असं जाहीर केलं. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनीही अशाच प्रकारची भूमिका घेतली असताना अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
अजित पवार म्हणाले..!
पवार साहेबांनी निवृत्त होण्याचा निर्णय काळानुसार घेतला आहे. तो कधीतरी घ्यावा लागणार होता. यामध्ये भावनिक होण्याचे कारण नाही, साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत. आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. साहेब असतीलच तर अल्पसंख्यांकाना न्याय मिळतील, असे म्हणणे चुकीचे आहे. साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणि मार्गदर्शनानुसार नवीन अध्यक्ष काम करील.
पुढे ते म्हणाले, काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब राजकारणातील त्याला बारकावे सांगतील. साहेबांच्या नजरेसमोर नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे, असा सवाल विचारत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अश्रू ढाळण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. रडारड करण्याचे कारण नाही. साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी होतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar : मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चौकशी व्हावी : अजित पवार