Ajit Pawar News : मुंबई : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला, त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाहीस. आता त्यांची गचांडी धरु का? पण आता बस झालं… मला यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा… स्वत: अजित पवार यांनी याबाबतची मागणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Ajit Pawar News)
मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको. (Ajit Pawar News)तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाले आहेत.
अर्थात मला कोणती जबाबदारी ध्यावी, हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन, असं अजित पवार म्हणाले.(Ajit Pawar News)
आपण कोठे कमी पडलो? कशामुळे कमी पडलो? कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आपण वर्चस्व निर्माण केलं. उत्तर महाराष्ट्रातही आपण चांगलं यश मिळवलं. आपण आज आनंदाचा दिवस साजरा करत असताना थोडं पाठीमागे वळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं मत अजित पवार यांनी मांडलं. अजित पवार यांनी यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचे कान टोचले. तुझ्या वॉर्डात राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे का? किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवली आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.(Ajit Pawar News)
आज नवीन कार्यकर्ते पुढे येत आहेत. वेगवेगळ्या विविध सेल काम करत आहेत. आता त्या सेलमध्ये बदल करायचा की नाही? कुठे पस्तीशी आहे ते फार चाळीशीपर्यंत गेलं आहे. आता तिथे बदल करा. (Ajit Pawar News)मी इतक्या वेळी सांगतो, कुणाचा तिथे इंट्रेस्ट अडकला आहे ते तरी समजू द्या. भाकरी फिरवायची झाली तर फिरलीच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाही. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत. आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण २५ वर्षे पूर्ण करुन २६ व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाही. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.(Ajit Pawar News)