Ajit Pawar News : पुणे : अजित पवार यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर अॅक्टिव्ह होत, आमदारांना निधीचे वाटप केले. या निधीवाटपानंतर उलटसुटल चर्चा सुरूच आहे. निधी वाटपात पवार यांनी भेदभाव केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यात आला. मात्र, आम्हाला काहीच निधी मिळाला नाही, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाही निधीचे वाटप करण्यात आले, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे. विदर्भातल्या अमरावती विभागातील जनता टॅक्स भरत नाही का? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी पवार यांना केला आहे.
निधीवाटपात भेदभाव केल्याची जोरदार चर्चा
अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे. शिंदे गटाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Ajit Pawar News) देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी प्रथम शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. नंतर घुमजाव करून त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर अहिरे यांच्या मतदारसंघासाठी ४० कोटींचा निधी देण्यात आला. जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी सुद्धा भरभरुन निधी देण्यात आला. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर निधीवाटपात भेदभाव केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
काय म्हणाले अजित पवार?
या चर्चांवर प्रतिक्रीया व्यक्त करत आता अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार म्हणाले की, निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. (Ajit Pawar News) सर्व आमदारांना समसमान निधी वाटप झाला आहे. विरोधक आरोप करतात, ते त्यांचे कामच आहे. मात्र, त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar News : राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा ; लवकरच शपथविधी…!
Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची एन्ट्री; अजित पवारांचं वक्तव्य खरं ठरणार!