Ajit Pawar News : पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात रोड शो करून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जंगी रोड शोच्या माध्यमातून अजित पवार गटाने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट सक्रीय झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट सक्रीय
अजित पवार यांच्या गटाने काढलेल्या बाईक रॅलीत अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नेते रूपाली चाकणकर, अजित पवार यांच्या रॅलीत दुचाकीवर बसून कार्यकर्त्यांना उत्साह वाढवला.
जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल महाराष्ट्र सरकारने माफी मागितली असली तरी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक सरकारवर दबाव आणत आहेत. (Ajit Pawar News) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी केलेला लाठीचार्ज योग्य नव्हता… मी सरकारच्या वतीने माफी मागतो. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरील महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची नुकतीच बैठक होऊन मराठा आरक्षण आणि आंदोलकांवर लाठीचार्ज या मुद्द्यावर चर्चा झाली. शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री- पवार आणि फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. (Ajit Pawar News) अजित पवार यांच्या रोड शोचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.
पुणे येथे रोड शो केल्यानंतर अजित पवार साताऱ्यात गेले. त्याठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर कोल्हापूर येथील सभेसाठी रवाना झाले. (Ajit Pawar News) एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे.