Ajit Pawar News : सातारा : नुकत्याच अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर जिल्हाधिकारी, कृषी सहाय्यक अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Ajit Pawar accused the government that the government is cheating the public and taking bribes for transfers of chartered officers)
अजित पवार म्हणाले की, ‘माझे अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. ते सांगतात की, आमचा उल्लेख करू नका, पण आम्हाला अधिकार असले, तरी मंत्रालयातून आलेल्या यादीतील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत, असे तोंडी आदेश आहेत. (Ajit Pawar News) त्यातील काही तर अगदी परदेशातही गेले आहेत. बदल्या होणं, यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे. कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या सांगितल्यावर बदल्या होणार हेही ठरलं आहे. हा अधिकार ठराविक आमदारांनाच दिला आहे. ते पण बदली करायची की नाही यावर चर्चा करतात.
सातारा येथील कार्यक्रमात केला आरोप
कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रुपये आहे, असं प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलं आहे. लाखो-कोट्यावधी रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसं करू शकतील? शासन आपल्या दारी नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं तरी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय उपयोग नाही. (Ajit Pawar News) शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नाही.’
अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यापूर्वीही केले आहेत. सातारा येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ‘सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत. आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. (Ajit Pawar News) राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत’, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar News : उमेदवारीसाठी रस्सीखेच कराल तर आपल्या कानाखाली आवाज निघेल ; अजित पवारांचा इशारा..