Ajit Pawar : राज्यात २०१९ ला झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचा अंक रंगल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. आधी शिवसेना-भाजपाचं नाट्य रंगलं. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये मोठी फुट पडली. अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. चारच दिवसात ते सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. २०२२ साली ठाकरे गटात मोठी फूट पडली.
पुन्हा सरकार कोसळलं. २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडली आणि अजित पवार काही सहकारी घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातला सत्तानाट्याचा रंग अजून संपला नसल्याचंच सातत्याने समोर येत आहे. आता अजित पवार गट भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार थेट मोदींनाचं हटवण्याची भाषा करत आहेत.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत मोदींना टोला
अजित पवार यांच्या या व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण २०१९ च्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करत आहेत. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजतंय.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
या व्हिडीओमध्ये अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत भाजपाला हटवण्याची विनंती समोरच्या उपस्थित नागरिकांना करताना दिसत आहेत. “उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण या मोदींना हटवा. भाजपाला बाजूला करा”, असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहेत. यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
अजित पवारांकडून advance मधे जनतेला खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! pic.twitter.com/KahtXhaSuw
— yogesh sawant (@yogi_9696) January 14, 2024