पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली भाषणं चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी वक्तव्यं केलं होतं. त्यामुळे अजित पवार वादात अडकले होते. विरोधकांकडूनसुद्धा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अजित पवारांना प्रचारसभेमध्ये विकासनिधीवरुन वक्तव्य केल्यामुळे क्लीन चिट देण्यात आलायं.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केलाय. याबाबत विरोधकांकडून देखील टीका करण्यात आली. तसेच आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आलीय. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवली आहे.
इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा, अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली.
अजित पवारांनी प्राथमिक चौकशीत केलेल्या वक्तव्यामध्ये कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही असे कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला योग्यरित्या फायदा होणार आहे, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे कधीच विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देणार आहोत. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता घेऊ शकतो.