Ajit Pawar | मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीतील नाराज आमदारांचा गट बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार राष्ट्रवादीत नाराज…
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून ते भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. शिवाय पवार सकाळ पासून नॉटरिचेबल आहेत. यादरम्यान अजित पवार यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादिचे नेते व अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे परत एकदा ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दिसू लागल्या. याचदरम्यान पवार यांनी त्यांचे पुण्यातील कार्यक्रम का रद्द केले हे समोर आले आहे. पवार हे सकाळ पासून नॉटरिचेबल असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. मात्र अशातच ते मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्यात असल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे तेरा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घाघटनेनंतर सर्व कार्यकाम रद्द केल्याचे अजित पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय पनवेल येथे श्री सेवकांच्या भेटीला जाणार असल्याने आजचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Politics : ‘राज्याच्या राजकारणात 2 बॉम्बस्फोट होणार’; प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा