मुंबई : ब्रिटनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे देखील परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सुद्धा ब्रिटनमधून परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले असून यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
सन २०२४ साली शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यापूर्वी ही वाघनखे राज्यात परत आणणार आहोत. त्यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.