(Aditya Thackeray) मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्याचा जागतिक डंका या निमित्ताने असल्याचे समोर आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासह ६ भारतीयांचा समावेश..!
ठाकरे यांच्यासह ६ भारतीयांचा समावेश या यादीमध्ये आहे. महाराष्ट्रातील युवा नेतृत्व म्हणून आदित्य यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय नेते, संशोधक, उद्योजक व दूरदर्शी कार्यकर्ते यांचा यामध्ये या यादीमध्ये समावेश करण्यात येत असतो.
दरम्यान, आदित्य यांच्यासह भाजप युवा विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे, तर टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायझीनचे कार्यकारी संचालक विबिन जोसेफ, उद्योग गटात जियो हॅप्टिक टेक्नॉलॉजीच्या आकृती वैश, आणि थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.
यात ४० वर्षांखालील तरुणांना एकमेकांकडून प्रेरणा घेता यावी आणि एकमेकांना विविध आव्हाने देता यावीत याकरिता यंग ग्लोबल लीडर्सचे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून तरुणांनी केलेल्या नव्या कल्पनांचा जागतिक स्तरावर प्रचार होऊ शकेल. हा या मागचा उद्देश आहे. यंग ग्लोबल अवॉर्डची स्थापना २००४ मध्ये झाली व तेव्हापासून अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी जगामधून उत्कृष्ट व्यक्तींचा एक समूह तयार केला जातो. जगभरातील १२० देशातून १४०० सदस्य व माजी विद्यार्थी यांचा यामध्ये समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष ; उदयनराजे भोसले
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??