नाशिक : नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे आता मोठ्या अडचणीत सापडले आहे. कंपनीत पदाचा गैरवापर केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
2016 साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला ठेका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरू होती. एकीकडे सलीम कुट्टा प्रकरणी चौकशी सुरु आहे. त्यातच आता बडगुज यांच्यावर एसीबीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणावर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे., मला या संदर्भात माहिती नाही. पुढे काय करायचं ते कायदेशीर रित्या पाहून घेऊ.असे त्यांनी बडगुजर यांनी म्हटले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुट्टा याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.