लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अभिजित रामदास बडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष विकास कदम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. गुरुवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनानिमित्त कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया कदमवाकवस्ती येथील ग्रामपंचायत हद्दीत सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अभिजित बडदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, अध्यक्षपदी अभिजित बडदे यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच माजी उपसरपंच देविदास काळभोर व सतिश काळभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच राजश्री काळभोर, माजी उपसरपंच देविदास काळभोर, अशोक कदम ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, सिमिता लोंढे, बिना काळभोर मंदाकिनी नामुगडे, सुनंदा काळभोर, दिपक आढाळे, नासीरखान पठाण, रुपाली काळभोर, राणी गायकवाड, सोनाबाई शिंदे, सलिमा पठाण, अविनाश बडदे, स्वप्नेश कदम, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, सतिश काळभोर, मावळते अध्यक्ष विकास कदम, पोलीस पाटील प्रियंका भिसे आदी उपस्थित होते.