पुणे : जुन्नर तालुक्यातील सतरा पैकी सात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज अखेरपर्यंत १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज आला नाही.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सोमवार (शुक्रवार) २ डिसेंबरपर्यत मुदत असून उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर, चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्धी ७ डिसेंबर व मतदान १८ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
आज ( ता.३०) अखेर १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. काळवाडीच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक चार, त्याखालोखाल झापवाडी तीन,साकोरी व बोतार्डे प्रत्येकी दोन तसेच सावरगाव व हिवरे तर्फे मिण्हेर साठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
सतरा ग्रामपंचायतीच्या ५५ प्रभागातील १४० सदस्यांसाठी निवडणूक होत असून सात ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण ६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात काळवाडी-२४, बोतार्डे-१४,साकोरी-१२,पारगाव तर्फे आळे-४, सावरगाव-३,झापवाडी-३,आणे-१.