पुणे : महाराष्ट्रात शिवसेनेतील 12 बंडखोर खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. याच बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीपासून ही सुरक्षा देण्यात आली आहे. या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांना नेता करण्याची विनंती केली होती.
प्रत्यक्षात 18 पैकी 12 शिवसेनेचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन करू शकतात. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर करू शकतात, अशीही चर्चा होती.
शिवसेनेच्या शिंदे गटाने सोमवारी बोलावलेल्या बैठकीला 19 पैकी 12 शिवसेनेचे खासदार हजर राहिले, याउलट उद्धव ठाकरे गटाने सोमवारी संध्याकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज दाखल करून विनायक राऊत यांची संसदीय पक्षाचा नेता म्हणून रीतसर नियुक्ती केल्याचा अर्ज दिला.
दरम्यान पक्षापासून फारकत घेतलेल्या गटाचे कोणतेही प्रतिनिधित्व विचारात घेऊ नका, असे आवाहन पक्षाने केले आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राऊत यांनी सभापतींना पत्र सादर केले असून, त्यात राजन विचारे यांना मुख्य प्रतोद करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.