पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली पुणे जिल्हातील एका आमदार महोदयाला तब्बल शंभर कोटी रुपयांची टोपी घालण्याचा प्रयत्न चार जणांनी केल्याची बाब पुढे आहे. आमदार महोदयांच्या चाणाक्षपणे शंभर कोटी रुपयांना गंडा घालण्याचा डाव उधळला गेला असुन, पुणे जिल्हातील चाणाक्ष आमदार महोदयांच्या बरोबरच, राज्यातील आनखी तीन आमदारांना अशाच प्रकार गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आली आहे.
दरम्यान कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याचा प्रयत्न झालेल्या पैकी एका आमदार महोदयांच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३, नागपाडा, मुंबई) या चार ठगांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चारही ठगांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे बंड होण्यामागे व एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडुन हजारो कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप, मुळ शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्ष करत असताना, मंत्री होण्यासाठी आमदाराकडे १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने राज्यात एकच खलबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असुन, शिंदे गटातील व भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी ‘नंदनवन’ आणि ‘सागर’ या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. तर कांहीजण आपआपल्या जिल्हातील वरीष्ठ नेत्यांच्या माध्यमातुन मंत्रीपदासाठी शिंदे व फडवणविस यांच्याकडे लॉबिग करत आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत वरील चार आरोपींनी पुणे जिल्हातील एका आमदार महोदयासह, राज्यातील अन्य तीन आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
मात्र वरील चार ठगांच्या हालचालीबद्दल एका आमदार महोदयांना संशय आल्याने, त्यांनी ही बाब मुंबई पोलिसांच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय पध्दतीने वरील चार जनांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. याच दरम्यान आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. व मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.
दरम्यान शंभर कोटीपैकी वीस टक्के रक्कम त्वरीत द्यावे लागेल व त्यासाठी आ्रमदार महोदयांना वेगवेगळ्या वेळेनुसार आरोपीने नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. आमदार महोदय व वरील चार जणांच्यापैकी एक जण हॉटेलमध्ये चर्चा करत असतानांच, साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपीची नावे समोर आली. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.