लोणी काळभोर, (पुणे) : भारतीय जनता पक्ष हा तळागाळातील नागरीकांची कामे करणारा पक्ष आहे. पक्षाची कामे लोकापर्यंत पोहचविण्याची कार्यकर्त्यांची जिद्द हवी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्या सरकारची बाजू मांडली पाहिजे. विविध समाज घटकासाठी केलेल्या कामाची माहिती घेऊन ते त्या त्या वर्गाला सांगण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील जनहित सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त एंजल हायस्कूल या ठिकाणी कदमवाकवस्तीचे शहराध्यक्ष विशाल गुजर यांनी मोफत आधार कार्ड शिबीर, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, व चष्मे वाटप अशा विविध योजनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंद बोलत होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष (संघटक) जनार्दन दांडगे, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, पी एम आर.डी.ए.चे सदस्य स्वप्निल उंद्रे, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, कमलेश काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, कदमवाकवस्तीचे ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, हभप विनोद महाराज काळभोर, माजी सरपंच नंदकुमार काळभोर, सुशील काळभोर, नितीन टिळेकर, सतीश काळभोर, प्रदीप गुजर, बाबासाहेब चव्हाण, प्रज्वल गुजर, सौरव गुजर, राज गुजर, प्रज्वल काळभोर, अभिजीत बारसकर, छत्रपती ग्रुपचे सभासद व जनहित सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना कंद म्हणाले, ” संपर्क, संवाद, सेवा हा भाजपाचा आत्मा आहे. या शिबिरामुळे सर्व सामान्य नागरिकांना लाभ झाला आहे. आपल्या सरकारने व कार्यकर्त्यांनी केलेली कामे लोकांना आवर्जून आणि आत्मविश्वासाने सांगावी त्यामुळे लोकांना माहिती होईल.
दरम्यान, या उपक्रमासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला, विविध योजना तसेच मोफत आधार कार्ड मोहीम याचा अनेक नागरिकांना फायदा झाला. तसेच दिवसभर प्रवीण काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. व आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्टार निवेदक शाहीर महेश खूळपे यांनी केले तर आभार कमलेश काळभोर यांनी मानले.