हडपसर : पुणे महानगरपालिका निवडणुकीत महिलाच बाजी मारणार आहेत. असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीच्या हडपसर महिलाध्यक्ष मंदाकिनी नलावडे यांनी केले आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक येथील अतिथी हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन मंदाकिनी नलावडे यांनी केले आहे. यावेळी शहराध्यक्ष पूजा मनीष आनंद, प्रदेश सचिव स्वाती शिंदे, जिल्ह्याध्यक्ष सीमा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या कि, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाहता, पुणे शहरात काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त महिला सक्रिय व्हाव्यात. तसेच महिलांना रोजगार निर्माण व्हावा. याकरिता कार्यक्रम हाती घेणार आहे. असे आनंद यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, काँग्रेस कमिटी हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष मंदाकिनी नलावडे यांची निवड झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघाची पहिलीच महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आगामी काळात काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त महिलांचा प्रवेश करण्याबरोबर महापालिका निवडणुकीत बाजी मारण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बैठकीचे आयोजन हडपसर विधानसभा महिला अध्यक्षा मंदाकिनी नलावडे यांनी केले होते.
यावेळी काँग्रेस कमिटी महिला शहर उपाध्यक्षा पल्लवी सुरसे, शहर सचिव माया डुरे, पुरंदर हवेली अध्यक्षा रुपाली कोंडे, माजी उपसरपंच पुष्पा गायकवाड, ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर संघटक इम्रान शेख, सरचिटणीस सुभाष सरोदे, महेश नलावडे, हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रा.शोएब इनामदार, कांचन बालनायक, शरीना शेख, मुसैब शेख यांच्यासह हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल लांडगे यांनी तर आभार माया डुरे यांनी मानले.