मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनाथ बन यांची माध्यम प्रमुखपदी तर केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याचे भाजपा कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मान्यतेने ही घोषणा करण्यात आली. तसेच विश्वास पाठक तसेच अजित चव्हाण हे सहमुख्यप्रवक्ते असणार आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार आमदार राम शिंदे, अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्णी, श्वेता शालिनी, गणेश खणकर, राजीव पांडे व प्रेरणा होनराव यांना प्रवक्ते पद देण्यात आले आहे.
यावेळी विषयानुरूप तज्ज्ञ प्रवक्ते म्हणून ३१ जणांची निवड करण्यात आली आहे. यात खासदार अनिल बोंडे, आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दटके, सिद्धार्थ शिरोळे, श्वेता महाले, गणेश हाके, अवधूत वाघ यांचा समावेश आहे. पुण्यातून आमदार सिद्धार्थ शिरोळे, विनायक आंबेकर व आली दारूवाला यांची वर्णी या यादीत लागली आहे.
विषयानुरूप तज्ज्ञ प्रवक्त्यांच्या यादीत मुंबईतून तब्बल ९, नागपूर मधून ५, पुण्यातून तिघांना या यादीत स्थान मिळाले आहे. बाकी जिल्हा स्तरावर प्रत्येकी एका प्रवक्त्याची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकानुसार जाहीर करण्यात आली आहे.