लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील लिलावती हरिश्चंद्र काळभोर (वय – ८८) यांचे अल्पशा आजाराने आज बुधवारी (ता. १५) निधन झाले आहे.
दौंडच्या माजी आमदार रंजना सुभाषराव कुल यांच्या त्या मातोश्री तर आमदार राहुल कुल यांच्या त्या आजी होत. तसेच कदमवाकवस्तीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र हरिश्चंद्र काळभोर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
लिलावती काळभोर यांच्यावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमी येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी करण्यात येणार आहे.