शिरूर – घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा आमदार अशोक पवार यांची एकहाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत आमदार अशोक पावर यांच्या शेतकरी पॅनलचा १९-१ च्या फरकाने बाजी मारून विजयी झाला आहे.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आमदार पवार यांची गेली २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. ही लढत आमदार अशोक पवार यांचा शेतकरी पॅनल व माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे, सर्वपक्षीय नेते मिळून किसान क्रांती पॅनल यांच्यात झाली.
या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी (दि.६ रोजी) पार पडली. त्यानंतर आज सोमवारी (दि.७ रोजी ) न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी साडे नऊ पासून सुमारे ३० टेबल वर मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली. सकाळपासून कार्यकर्त्यांनी मतमोजणीसाठी प्रचंड गर्दी केली होती. सहा फेऱ्यांमध्ये केलेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने आघाडी घेत १९ जागांवर विजय मिळवला.
यापूर्वी १ जागा बिनविरोध झाल्याने राष्ट्रवादी चे २० उमेदवार बलाबल झाले आहे. तर विरोधी किसान क्रांती पॅनलच्या प्रमुखांनी चांगली लढत विजय मिळवला. काही ठिकाणी मतमोजणी सुरू असताना दोन्ही पॅनल मध्ये चुरस झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, या मतमोजणी साठी २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर, सहायक निवडणूक अधिकारी शंकर कुंभार, अहमदनगर चे सहायक निबंधक अल्ताफ शेख, अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मताला नाही पण उसाला भाव देणार असा नारा देणाऱ्या किसान क्रांती पॅनलने कडवी झुंज देत लढवलेली निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय ठरली.
विजयी उमेदवार व पडलेली मते पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक १ मांडवगण फराटा
फराटे संभाजी शिवाजी ( 7180),
फराटे दादासाहेब गणपत (6938)
गट क्रमांक-2 इनामगाव –
मचाले सचिन बाबासाहेब (7768), माने नरेंद्र आण्णासो (7452),
गट क्रमांक – 3 वडगाव रासाई। पवार अशोक रावसाहेब (8172), साठे उमेश सुदाम (7409),
गट क्रमांक -4 न्हावरे – काळे संजय ज्ञानदेव (7826), निंबाळकर शरद मोहनराव ( 7732), कोरेकर मानसिंग सीताराम (7639)
गट क्रमांक 5- तळेगाव ढमढेरे
गवारी सोपान वाल्मिकराव (7686), ढमढेरे विश्वास रामकृष्ण (7362), भुजबळ पोपट रामदास (7136)
गट क्रमांक 6 शिरूर –
कुरुंदळे वाल्मिक धोंडिबा – (7619), थोरात सुहास नारायण (7417), पाचुंदकर प्रभाकर नारायण (6378)
महिला राखीव
कोडे मंगल सुहास (7645),
जगताप वैशाली सुनील (7551),
अनुसूचित जाती जमाती
सोनवणे उत्तम रामचंद्र (7614),
इतर मागास प्रवर्ग –
गदादे शिवाजी मुक्ताजी (7426)
— भटक्या विमुक्त जाती जमाती – शेंडगे बिरा बाबू (7201)