हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मणीभाई देसाई सहकारी या पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या १३ जागासाठी मतदान ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान होणार आहे.
निवडणूकिसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारपासून (ता. ०४) स्वीकारले जाणार असून अर्ज स्वीकारण्यासाठी पुढील शुक्रवार (ता. ११) पर्यंतचा कालावधी आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून अर्जाची छाननी सोमवार दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होईल, १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ मंगळवार दि. १५ नोव्हेंबर ते मंगळवार दि. २९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील, पात्र उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम बुधवार दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होईल, मतदान रविवारी ११ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेवर संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र या निवडणुकीत राजेंद्र कांचन यांचे एकेकाळचे सहकारी व पतसंस्थेचे माजी मानद सचिव सुनील जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, राष्ट्रवादीचे युवा नेते अर्जुन कांचन हे राजेंद्र कांचन यांच्या विरोधात निवडणुकीसाठी दंड थोपाटण्याची शक्यता आहे.
डॉ.मणिभाई देसाई ग्रा.बि.शे.सह. पतसंस्था निवडणूक (पंचवार्षिक सन २०२२ ते २०२७) विस्तृत कार्यक्रम प्रक्रिया पुढीलप्रमाणे –
१) मतदार संघाचे नाव
* सर्व साधारण – ८
*महिला प्रतिनिधी – २
*अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी -१
* इतर मागास प्रतिनिधी -१
*भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी – १
* एकूण मतदार संघ = १३
२) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा कालावधी व ठिकाण
* दिनांक-४/११/२०२२ ते ११/११/२०२२
* वेळ – सकाळी ११ दुपारी ३ वाजेपर्यंत
* स्थळ- निवडणूक कार्यालय (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर, साखर संकुल, तळमजला, शिवाजीनगर पुणे ५.)
३) पोचलेली नामनिर्देशन पत्रे प्रसिध्द करण्याची तारीख वेळ व स्थळ –
*दिनांक-४/११/२०२२ ते ११/११/२०२२
* वेळ- जसजशी प्राप्त होईल त्याप्रमाणे रोज दुपारी ४ वाजता
* स्थळ- निवडणूक कार्यालय (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर, साखर संकुल, तळमजला, शिवाजीनगर पुणे ५)
४) नामनिर्देशन पत्राच्या छाननीची तारीख, वेळ व स्थळ –
दिनांक-१४/११/२०२२
* वेळ- सकाळी ११ वाजता
*स्थळ- निवडणूक कार्यालय (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर, साखर संकुल, तळमजला, शिवाजीनगर पुणे ५)
५) विधी ग्राहय नामनिर्देशनांची सूची प्रसिध्द करण्याची तारीख, वेळ व स्थळ-
दिनांक-१५/११/२०२२
* वेळ- सकाळी ११ वाजता
*स्थळ- निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड
६)’नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची तारीख, वेळ व स्थळ
*दिनांक-१५/११/२०२२ ते २९/११/२०२२
* वेळ- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
*स्थळ- निवडणूक कार्यालय
७) पत्र उमेदवारांना निशाणी वाटपाचा व अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करण्याची तारीख
*दिनांक-३०/११/२०२२
* वेळ- सकाळी ११ वाजता
*स्थळ- निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड
८) आवश्यक असेल तर मतदान ज्या तारखेस घेण्यात येईल, ती तारीख, वेळ
*दिनांक-११/१२/२०२२
* वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
*स्थळ- नंतर घोषित करण्यात येईल
९) मतमोजणी तारीख व वेळ –
*दिनांक-१२/१२/२०२२
*स्थळ- नंतर जाहीर करण्यात येईल
१०) मतदानाचा निकाल जाहीर करणे
*मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच.