विशाल कदम
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हरीश भिवाजी कांचन यांची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) गटाच्या उरुळी कांचन शहरप्रमुखपदी तर अमोल ननावरे यांची उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या उरुळी कांचन शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. लांडेवाडी येथील एका कार्यक्रमात शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे,जिल्हा उपप्रमुख शामराव माने, जिल्हा संघटक निलेश काळभोर, हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, उपप्रमुख हरीश विठ्ठल कांचन, हवेली विभागप्रमुख सागर फडतरे, हवेली तालुका वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अभिषेक पवार, भूषण ढवळे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात शिवसेना प्रमुखांचा आदेश अंतिम मानून शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांवर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे, कसोटीने पक्ष बांधणी करून सामाजिक कार्य करण्यासाठी वरील निवडी करण्यात आल्या आहेत.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित शहर प्रमुख हरीश कांचन म्हणाले, उरुळी कांचन- सोरतापवाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये सक्रिय तरुणांची बांधणी करणार आहे. या दोन्ही गट आणि गणामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सदस्य असणार आहे. असा ठाम विश्वास कांचन यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या व मित्र पक्षातल्या ज्येष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे. तसेच शहरात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर नवनिर्वाचित उरुळी कांचन शहर उपप्रमुख अमोल ननावरे यांनी सांगितले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गटाची उरुळी कांचन शहराची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
१)हरीश भिवाजी कांचन (शहर प्रमुख)
२) अमोल सुनील ननावरे (शहर उपप्रमुख)
३) कुणाल राहुल कांचन (युवा सेना उपविभाग प्रमुख)
४) ताहीर गुलाब भाई तांबोळी (अल्पसंख्यांक सेल प्रमुख)