मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : दर्जेदार अन्न हे केवळ आरोग्याच्या दृष्टीने ठरवले जात नाही. त्याचे किती उत्पादन होऊ शकते, सर्वत्र होऊ शकते की नाही, त्यामुळे पर्यावरणाची किती हानी होते, त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते का, असे अनेक प्रश्न आहेत; ज्यांची उत्तरे अधिक दर्जेदार अन्न ठरवताना शोधली जातात. अशाच एका गमतीशीर अभ्यासात, शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, मांसाहारीसाठी अन्न म्हणून अजगराचा पर्याय अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. अजगराचा अन्न म्हणून गांभीयान विचार केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने पारंपरिक पशुपालनाशी तुलना करून व्यावसायिक अजगर पालनाचा खर्च आणि त्याच्या पर्यावरणीय खर्चाची तपासणी केली. या अभ्यासाचे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आणि आशादायकही होते. अजगर वेगाने वाढतात. भुकेले असतानाही त्यांची वाढ होते. ते जेवढे अन्न खातात, त्यापेक्षा जास्त मल त्यांच्या शरीरातून बाहेर पडतो. हा मल कोंबडी आणि उंदरांच्या तुलनेत जास्त आहे. एवढेच नाही तर अजगरांना इतर मांस उद्योगातून मिळणाऱ्या कचऱ्यातून खाद्य दिले जाऊ शकते. अन्न म्हणून अजगर निवडण्याचे अनेक फायदे आहेत. अजगर कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहून स्वतःला जिवंत ठेवू शकतात. त्यामुळे कठीण परिस्थितीतही अजगरांना जिवंत ठेवता येते. ऑस्ट्रेलियातील मॅक्केरी विद्यापीठाचे हर्पेटोलॉजिस्ट डॅनियल नेटश म्हणाले की, अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप उपयुक्त ठरू शकते. टीमने व्हिएतनाम आणि थायलंडमधील शेतात १२ महिने पाळलेल्या अजगरांच्या दोन प्रजातींचा अभ्यास केला. या गमतीशीर अभ्यासात, संशोधकांनी अजगराने खालेले अन्न आणि त्यातून मिळणाऱ्या मांसाचे गुणोत्तर मोजले.
त्यामध्ये अजगराचे हे प्रमाण १.२ निघाले. सालमन माशाचे हे प्रमाण १.५, कुक्कुटपालन २.८ तर मिळणाऱ्या मांसाचे प्रमाण १०.० असल्याचे आढळून आले. म्हणजे अन्नासाठी हे अधिक योग्य आहेत. या अभ्यासातून नेटश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की, अजगराची व्यावसायिक शेती ही जैविक आणि आर्थिकदृष्ट्या अन्नासाठी योग्य आहे. अजगरांचे पालन करणे, वाढवणे हे एक आव्हान असू शकते. त्याच वेळी आपण मांस खावे की नाही, हादेखील न संपणारा प्रश्न आहे. याशिवाय सायंटिफिक रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात संशोधकांनी अजगराच्या चवीच्या मुद्द्याला स्पर्शही केलेला नाही.