Polluted Cities in the World : मुंबई : जगातील दहा सर्वाधिक प्रदुषित शहारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत देशातील तीन शहराचा समावेश झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. या यादीत राजधानी दिल्लीचा जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरात पहिला क्रमांक आला आहे. तर पहिल्या पाच शहरात भारतातील तीनही शहरांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता देशाच्या स्वच्छते विषयी प्रश्न उभे केले जात आहेत.
जगातील 10 प्रदुषित शहराची यादी स्विस ग्रुप आयक्यूएअरने जारी केली आहे. हा ग्रुप वायू प्रदुषणावर आधारित एअर क्वालिटी इंडेक्स तयार करतो. या यादीप्रमाणे देशाची राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश टॉप टेन प्रदुषित शहरात समावेश झाला आहे. या यादीला तयार करण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी स. 7.30 वाजताच्या डाटाचा वापर केला आहे. सलग तीन दिवसहा डेटा वापरला गेला. वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. या यादीत दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातील लाहोर शहर आहे.
या यादीनूसार 519 AQI मुळे दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या लाहोर ( AQI 283 ) शहराचा क्रमांक लागला आहे. 185 AQI सह कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर 173 AQIसह मुंबईचा क्रमांक लागला आहे. पाचव्या क्रमांकावर आखाती देश कुवैतची राजधानी ( AQI 165) कुवैत सिटी आहे.