Death of Illya Golem : जगातील प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलिया गोलेम येफिमचिक याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तो केवळ 36 वर्षांचा होता.
इलियाच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याची पत्नी अॅना हिने सांगितले की, 6 सप्टेंबरला सकाळी गोलेमला अचानक अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवसांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोलेम येफिमचिकचे मोठे शरीरच त्याच्या मृत्यूचे कारण बनल्याचे सांगितले जात आहे. या बॉडीबिल्डरला ‘म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते.
इलियाच्या शरीराच्या आकाराचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो, की त्याची छाती 61 इंच होती आणि बायसेप 25 इंच होते. त्याचे वेटलिफ्टिंग 700-पाऊंड स्क्वॅट, 700-पाऊंड डेडलिफ्ट आणि 600-पाऊंड बेंच प्रेस होते. इलिया गोलेमचे वजन 160 किलो होते. त्याला दिवसांतून 7 वेळा जेवण करावे लागायचे.
दरम्यान, अलीकडच्या काळात, जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, मग तो सेलीब्रिटी असो किंवा सामान्य माणूस.