Parliament Winter Session : यावर्षीच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाली आहे. यंदाचे अधिवेशन हे 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबद्दलची माहिती संसदीय कार्यमंत्री किरण रिजुजी यांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशनात ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक तसेच ‘वक्फ विधेयक’ पास होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. अधिवेशनात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देखील पास केला जाण्याची शक्यता आहे.
26 नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणारा संविधान दिनाचा कार्यक्रम संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे. 18 व्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत संपन्न झाले. त्यावेळी विधेयक मांडण्यात आली. यामधील वित्तविधेयक 2024, विनियोग विधेयक 2024, काश्मीर विनियोग विधेयक 2024, आणि भारतीय वायुयान विधेयक ही चार विधेयके पास करण्यात आली.
The Winter Session of Parliament begins on 25th November and will continue till 20th December 2024, tweets Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju pic.twitter.com/EoDO7wrFe7
— ANI (@ANI) November 5, 2024