नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी थेट कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत सुनावले आहे. “तुम्ही इतिहास विसरू नका”, असा थेट इशारा देत राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक प्रक्षोभक विधान केले होते. “भारताने जर कोणतेही धाडस केले किंवा ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’चा प्रयत्न केला, तर पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल,” दरम्यान, भारताकडून सीमेवर होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे.

राजनाथ सिंह यांनी ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर उत्तर देतांना म्हंटले कि, “पाकिस्तानने अशा प्रकारची भडकाऊ विधाने टाळावीत. 55 वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. यावेळी जर त्यांनी बंगालकडे वाईट नजरेने पाहिले, तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवालाच ठाऊक!”
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, सीमेपारून होणाऱ्या दहशतवादाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.






