दिल्ली : एनडीएमध्ये मोठा असंतोष असून अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. या सरकारमधील घटकपक्षांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे हे सरकार कधीही कोसळू शकतं, असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
एनडीए सरकारमधील अनेकजण संपर्कात आहेत. मोदींना अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सध्या भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक केली नसती तर इंडियाचं बहुमत आलं असतं, असाही दावा राहुल गांधींनी केला आहे.
पुढे म्हणाले, एनडीएचं सरकार नितीश बाबू आणि चंद्रबाबूंच्या टेकूवर उभं आहे. त्यातच नितीश कुमार यांची देशाच्या राजकारणात पलटूराम अशी असलेली ओळख आणि चंद्रबाबूंनी आधी मोदींवर केलेली टीका आणि त्यानंतर मोदींसोबत जुळवून घेतल्यामुळे ते एनडीए सरकारमधून कधीही बाहेर पडण्याची चर्चा वारंवार रंगत आहे.
निकालावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, ‘द्वेष आणि रागाच्या राजकारणातून फायदा होऊ शकतो, ही कल्पना भारतातील जनतेने या निवडणुकीत नाकारली आहे. ज्या पक्षाने गेली 10 वर्षे अयोध्येबद्दल बोलण्यात व्यतीत केले तोच पक्ष अयोध्येतून साफ गेला आहे. धार्मिक द्वेष निर्माण करणारी भाजपची मूळ रचनाच कोलमडली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.