Petrol Diesel Price Today : देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी सरकारचा भार हलका करणार आहेत. या तीन वर्षात जे झाले नाही, ते मुकेश अंबानी करणार आहेत. त्यांच्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचे चिन्हे आहेत.
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त ?
डिसेंबर महिन्यात ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निर्णय घेतला. त्यानुसार, ज्या देशांवर निर्बंध नाहीत, अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल आयात करु शकतो. त्यामुळे आता भारतात कच्च्या तेलाच्या व्हेनेझुएलाहून आयात करण्याची शक्यता आहे.
भारतात तीन वर्षांनंतरव्हेनेझुएला येथून कच्चे तेल खरेदी करण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलातून कच्चं तेल आयात करण्यावर लादलेले आर्थिक निर्बंध २०१९ मध्ये उठवण्यात आले आहेत. कमोडिटी मार्केट ॲनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलामधून तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये कच्च्या तेलाची भारतात आयात करण्यात आली होती.
मुकेश अंबानी करणार करार
देशात आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कच्च्या तेलाच्या आयातीसंदर्भात थेट व्हेनेझुएलाशी व्यवहार करणार. हे डिसेंबर २०२३ मध्ये स्पष्ट झालं होतं. त्यानंतर रिलायन्स कंपनीने कच्च्या तेलाचे ३ टँकर बुक केल्याची माहिती समोर आली आहे. या टँकरची डिलिव्हरी जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे.