लखनऊ: लग्नानंतर नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीशी विवाहबाह्य संबंध आणि पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध असणे ही आजच्या काळात सामान्य बाब झाली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या अशा अनेक घटना आपण रोज पाहत असतो. पण उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका व्यक्तीने प्रेयसीच्या हव्यासापोटी स्वतःच्याच पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आधी त्याने पत्नीला खूप मारले आणि त्यानंतर तिला फिनाईलपाजले. निष्पाप मुलगी आईला वाचवण्यासाठी आली असता आरोपींनी मुलींलाही मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालकटोरा येथे राहणाऱ्या संतोष यादवचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सुरळीत चालले, मात्र वर्षभरापूर्वी संतोषची एका महिलेशी मैत्री झाली. संतोष हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. संतोष आणि ती महिला वारंवार बोलू लागली.
ही बाब संतोषच्या पत्नीला कळताच तिने विरोध केला, त्यामुळे संतोषने तिला मारहाण केली. पत्नीने अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली, पण संतोष मानत नव्हता. हा कौटुंबिक वाद असल्याचे सांगत संतोषने पोलिसांची माफी मागून पत्नीशी समेट घडवून आणला होता आणि पुन्हा असे न करण्याचे आश्वासन दिले होते.
पण त्यानंतरही तो काही सुधारला नाही. तो प्रेयसीसोबत हॉटेलमध्येही जात असे. यावेळी संतोषच्या पत्नीने पतीच्या त्या महिलेसोबतच्या अवैध संबंधाला विरोध केला असता संतोषने संतप्त होऊन पत्नीला बेदम मारहाण केली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. यासोबतच संतोषने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने फिनाईल पाजले.
यावेळी संतोषच्या 12 वर्षांच्या मुलीने तिच्या आजीला घटनेची माहिती दिली, त्यानंतर तिचे पालक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलगी गंभीर अवस्थेत जमिनीवर पडलेली पाहिली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे सांगितले आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून शांतता भंग केल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.