Reserve Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया सह देशात अशा तीन बँका आहेत, ज्यामध्ये तुमचा पैसा सर्वात सुरक्षित राहू शकतो. या तिन्ही बँका कधीच डबघाईला येऊ शकत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने म्हटले आहे की, SBI व्यतिरिक्त, HDFC बँक आणि ICICI बँक देशांतर्गत आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बँका आहेत. देशातील आर्थिक व्यवस्थेच्या पातळीवर या बँका इतक्या मोठ्या आहेत की त्या कधीच बुडू शकत नाहीत.
ऑगस्ट 2015 पासून, RBI ला दरवर्षी या महिन्यात वित्तीय व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँकांच्या नावांची माहिती द्यावी लागते. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, आयसीआयसीआय बँक गेल्या वर्षीच्या समान श्रेणी आधारित संरचनेत राहिली आहे. त्याच वेळी, एसबीआय आणि एचडीएफसी बँक उच्च श्रेणीत गेले आहेत. नियमांनुसार, अशा संस्थांना प्रणाली स्तरावर त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन चार श्रेणींमध्ये ठेवता येते.
एसबीआय श्रेणी तीनमधून श्रेणी चारमध्ये आणि एचडीएफसी बँक श्रेणी एक मधून श्रेणी दोनमध्ये गेली. देशांतर्गत महत्त्वाच्या बँकांसाठी (D-SIBs) SBI चा अधिभार १ एप्रिल २०२५ पासून ०.८ टक्के असेल. तर HDFC बँकेसाठी तो 0.4 टक्के असेल.