US Presidential Election Results 2024 : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आज आपले 47 वे राष्ट्राध्यक्ष निवडणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा अमेरिकेच्या अध्यपदाच्या निवडणुका आणि निकालाकडे लागल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी थेट लढत होत असून आज जागतिक महासत्तेच्या नव्या अध्यक्षाचं नाव जगासमोर येणार आहे. डेमोक्रॅट कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी आपली ताकद आणि शक्तीप्रदर्शन केलं होतं. जर कमला हॅरिस जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील. जर ट्रम्प जिंकले तर दुस-यांदा राष्ट्रध्यक्षपदाची शपथ ते घेणार आहेत. त्यामुळे आधी मतदान आणि आता निवडणुकीच्या निकालाकडे फक्त अमेरिकेचच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे ट्रेंड वेगाने बदलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 198 मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेनं त्यांची आगेकूच सुरू झाली आहे. कमला हॅरीस यांना आत्तापर्यंतच्या मतमोजणीत अवघी 109 मतं मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती आता वेगाने धावू लागला आहे. त्याचवेळी कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅट पक्षाचे चिन्ह असलेले गाढव हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीत कमला हॅरिस की डोनाल्ड ट्र्म्प , कुणाचाही विजय होवो, पण भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे.