भदोही (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी (१७ फेब्रुवारी २०२४) यूपीच्या भदोहीमध्ये येत आहे. त्यांच्या ताफ्याला पूर्वनिश्चित विश्राम स्थळी मुक्काम करण्याची परवानगी प्रशासनाकडून मिळालेली नाही. आता ते मुन्शी लातपूर येथील एका मळ्यात राहणार आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे यांनी गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा जिल्ह्यातील ज्ञानपूर भागात असलेल्या विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार होती. 17 फेब्रुवारीच्या रात्री मात्र जिल्हा प्रशासनाने यासाठी परवानगी दिलेली नाही.
पोलीस काय म्हणाले?
अप्पर पोलिस अधीक्षक राजेश भारती म्हणाले की, विभूती नारायण इंटर कॉलेज हे पोलिस भरती परीक्षेचे केंद्र करण्यात आले आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी दोन्ही शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. त्यामुळे यात्रेला आवारात मुक्काम करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
काँग्रेस काय म्हणाली?
काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जिल्हा प्रशासनावर आडकाठी आणल्याचा आरोप करत ते म्हणाले की, यात्रेच्या मुक्कामाची माहिती पक्षाने आठवडाभर अगोदर प्रशासनाला दिली होती, मात्र असे असतानाही या महाविद्यालयाला केंद्र बनवण्यात आले. तर इतर अनेक महाविद्यालये पर्याय म्हणून देखील उपलब्ध होती.
त्यांनी सांगितले की, राहुल गांधी आणि त्यांचा ताफा आता मुन्शी लातपूर येथील उदयचंद राय यांच्या शेतात रात्री विश्रांती घेईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. मैदानात मुक्कामाची तयारी सुरू आहे.
दुबे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची न्याय यात्रा चौरीच्या कंधिया रेल्वे क्रॉसिंगवरून भदोही जिल्ह्यात प्रवेश करेल. त्यानंतर राहुल इंदिरा मिल चौकातील गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर ते राजपुरा चौरस्त्यावर जातील तेथे ते भदोही आणि मिर्झापूर जिल्ह्यातील जनतेला एका जाहीर सभेत संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी ते गोपीगंज मार्गे प्रयागराजला रवाना होतील.
भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू झाली असून ती 67 दिवसांत 6713 किलोमीटरचे अंतर कापून 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 20 मार्चला मुंबईत संपेल.