केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नी झिंगिया ओरम यांचं निधन झालं असून काही दिवसांपासून त्यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होता. परंतु डेंग्यूमुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांना सुद्धा डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.