जयपूर : राजस्थानमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. स्लीपर बस आणि टेम्पोची भीषण धडक होऊन अपघात झाला आहे. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून परत येत असताना रात्री उशिरा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्ग ११ बी वर रात्री उशिरा बाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनीपूर गावाजवळ हा अपघात झाला. स्पीपर कोच बस आणि टेम्पोची धडक इतकी भीषण होती की जागीच ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ८ लहान मुलं आहेत तर दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण बाडी शहरातील गुमट मोहल्ल्यात राहत होते. हे सर्व बरौली गावातील कार्यक्रमातून परतत होते.
मृत्यू झालेले सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमधील लहान मुलांचं वय ६ ते १४ वर्षे इतकं आहे. तर एका पुरुषाचे वय ३८ आणि दोन महिलांचे वय ३५ इतके आहे. याशिवाय तिघे जखमी झाले आहेत. सगळे कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून परत येत असताना बसची टेम्पोला धडक बसली. यामध्ये ७ जण जागीच मृत्यूमुखी पडले तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.