लहू चव्हाण
पाचगणी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे स्वातंत्र्य ७५ वर्ष असल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे. पाचगणी येथील नागरिकांनी या स्वातंत्र्य दिनाला आपापल्या घरांवर देशाचा राष्ट्रध्वज फडकावावा, असे आवाहन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.
यावेळी दापकेकर म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतिकारक यांचे स्मरण व्हावे तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण व्हावी याकरिता आझादी का अमृत महोत्सव या अनुषंगाने पाचगणी शहरात ११ ते १७ ऑगस्ट या दरम्यान पालिकेच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,रांगोळी, निबंध स्पर्धा आदींसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच, शहरातुन विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर झेंडावंदन करावे. असे देखील दापकेकर म्हणाले आहेत.