अयोध्या : वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक वृद्ध व्यक्ती आठशे किलोमीटर चालत प्रवास करत अयोध्याला पोहोचणार आहेत. छल्ला श्रीनिवास शास्त्री (वय ६४) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. शास्त्री त्यांच्यासोबत पंचधातूंनी बनवलेले खडाऊन घेऊन अयोध्येला जाणार आहेत. पाच धातूंनी बनवलेल्या सोन्याचा मुलामा चढवण्यात आला असून त्याची किंमत ६५ लाख रुपये आहे. शास्त्री चपला डोक्यावर घेऊन चालत आहेत.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. प्रभू रामाच्या अभिषेक विषयी संपूर्ण देशात उत्साह आहे. दूरदूरवरून भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. दरम्यान, हैदराबाद येथील एक वृद्ध व्यक्तीही रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहे. विशेष म्हणजे ८००० किलोमीटरचा पायी प्रवास करून वृद्ध अयोध्येला पोहचणार आहेत.
अयोध्येला पोहोचून हे खडाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवण्याचा त्यांचा मानस आहे. याआधी शास्त्रींनी पाच चांदीच्या विटा मंदिराला दान केल्या होत्या. प्रभू रामाच्या वनवासाच्या विरुद्ध दिशेने शास्त्रींची वाटचाल सुरू आहे. 20 जुलै रोजी त्यांनी प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान, त्यांनी वाटेत ओडिशातील जगन्नाथ पुरी, त्र्यंबक ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील द्वारका या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांनाही भेट दिली. येत्या 10 दिवसांत अयोध्येला पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
शास्त्री यांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी अयोध्येत कारसेवा केली आहे. वडील हनुमानाचे परम भक्त होते. अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. आता ते नाहीत पण, मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे. 20 जुलैपासून प्रवास सुरू केल्यानंतर काही दिवसांसाठी ब्रिटनला जायचे होते, असे ते सांगतात. यामुळे मी परत आल्यावर जिथून प्रवास अपूर्ण ठेवला होता तिथून पुन्हा प्रवास सुरू केला आणि ब्रिटनला गेलो. शास्त्री सध्या अयोध्येपासून २७२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रकूटला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत आणखी पाच जण आहेत. अयोध्येत घर बांधून कायमस्वरूपी स्थायिक व्हावे, अशी शास्त्रींची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.