बिहार : देशात सध्या कावड यात्रेचा मोठा उत्साह दिसून येत असून अशाच एका यात्रेवर काळाचा घाला पडला आहे. डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा शॉक लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन कुमार आणि आमोद कुमार अशी मृत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. तर राजीव कुमार याच्यासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील सुलतानपूर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास कावड यात्रा काढण्यात आली होती.
#WATCH | Bihar: Sadar SDPO Hajipur Omprakash says, “The Kanvarias were going on a DJ. The DJ was very high and there was a wire in which it got entangled. This led to the death of eight people while some others were injured and are undergoing treatment…Further investigation is… pic.twitter.com/vAJIbEvBPJ
— ANI (@ANI) August 5, 2024
नागरिकांसह अल्पवयीन मुले बाबाच्या जयघोषात डीजेच्या तालावर नाचत जात होती. यावेळी ट्रॅक्टरच्या टॉलीवर असलेल्या डीजेचा अचानक हायटेन्शन विद्युत वायरला स्पर्श झाला. त्यामुळे ट्रॉलीत विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी ट्रॉलीवर उभे राहून नाचत असलेल्या ११ जणांना विजेचा जोरदार शॉक लागला त्यामुळे ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. या घटनेनंतर नागरिकांनी मोठी आरडाओरड सुरू केली. ग्रामस्थांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. जखमी अवस्थेत असलेल्या ११ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील ९ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली.