Ram Navami : आज रामनवमीनिमित्त देशभरात उत्साह सुरु आहे. प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामनवमी साजरी होत आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
आज सूर्याच्या किरणांनी दुपारी बारा वाजता रामलल्लांना तिलक लावला. यावेळी सुमारे चार मिनीटे सूर्याची किरणं रामलल्लाच्या मूर्तीच्या डोक्यावर पडत असलेलं पाहावयास मिळाले. अशारितीने अयोध्येमध्ये रामलल्लांचा सूर्य-तिलकाचा सोहळा जल्लोषात पार पडला. ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येमध्ये गर्दी जमली होती.
सूर्य-तिलकासाठी अशी केली होती रचना…
- आज दुपारी 12 वाजता सूर्यकिरणं रामललाच्या माथ्यावर पडली.
- मंदिरातील घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेण्यात आला होता.
- या सिस्टिममध्ये सूर्य-तिलकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणजे त्यासाठी दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस लागले आहे.
- तसेच सगळ्यात मोठी लेन्स रामलल्लाच्या मंदिराच्या छतावर बसवण्यात आली होती.
- ती रिफ्लेक्ट होऊन ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत करण्यात आली मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून ही किरणे रामललाच्या कपाळावर पडली.अशारितीने रामलल्लांना ‘सूर्य-तिलक’ लावणं शक्य झालं, आणि हा सूर्याभिषेक संपन्न झाला.