जयपूर: बिकानेर सेंट्रल जेलमध्ये तीन अंडरट्रायल कैद्यांनी जेलरवर हल्ला केला. याप्रकरणी तिघा कैद्यांवर बीचवाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलर सूर्यनारायण सोनी गस्तीवर असताना कारागृह परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली. कारागृह रुग्णालयातून परतत असताना मोहम्मद समीर, आफ्रिद खान आणि सालेह मोहम्मद या तीन कैद्यांनी जेलरला धक्काबुक्की करून मारहाण केली आणि त्याला जमिनीवर पाडले.
बीचवाल पोलीस स्टेशनचे अधिकारी नरेश कुमार निर्वाण यांनी बुधवारी सांगितले की, कारागृह प्रशासनाने तीन अंडरट्रायल कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जेलरवरील हल्ल्यानंतर शेजारी काम करणारे इतर कैदी आणि रक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना वेगळे केले. या तिघाचा जेलरवर कोणत्या तरी मुद्यावरून राग होता, हे चौकशीनंतर समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.