Coronavirus In India : केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत २९२ कोविडबाधितांची नोंद करण्यात आली असून तीन जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात नोंदवण्यात आलेल्या 341 कोविड संसर्गांपैकी 292 रुग्ण केरळमधील होते.
तर आता केरळमध्ये 2041 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. (Corona Cases)