नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी HP ने आपला नवीन 23.8 इंचाचा ऑल-इन-वन HP NV Move पीसी लाँच केला आहे. हा पीसी स्पीड लक्षात घेऊन डिझाईन केला गेला आहे. यामध्ये सहजपणे उचलण्यासाठी आणि कुठेही नेण्यासाठी इंटिग्रेटेड हँडलदेखील देण्यात आला आहे.
HP NV Move पीसीमध्ये किकस्टँड लेग्जदेखील आहेत, ज्यामुळे तुम्ही तो टेबलवर सहजपणे ठेवू शकता आणि त्यामुळे तुमचा पीसी चांगल्या पद्धतीने स्थिर राहू शकतो. यामध्ये वायरलेस कीबोर्ड लावण्यासाठी, त्याच्यामागे एक कीबोर्ड पॉकेट आहे, ज्यामध्ये तुम्ही कीबोर्ड ठेवू शकता.
या पीसीमध्ये QHD टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पीसी 13 जनरल इंटेल कोर 15 प्रोसेसर आणि इंटिग्रेटेड इंटेल UHD ग्राफिक्स आहेत. याचे वजन फक्त 4.1 किलोग्रॅम आहे. यामध्ये मनोरंजन, व्हिडिओ कॉलही करता येऊ शकतो. हा पीसी त्याच्या 23.8-इंच QHD टच डिस्प्लेसह, तो युजरच्या सोयीसाठी ऑटो ब्राइटनेस आणि स्क्रीन ब्लरिंग मिळते.
यात इमर्सिव्ह व्हिज्युअल आणि ऑडिओसाठी IMAX डिस्प्ले आहे. त्याचा अॅडजस्टेबल एचडी कॅमेरा आणि एचपी एन्हांस्ड लाइटिंगमुळे व्हिडीओ कॉल अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे.