लखनऊ : लखनऊमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. पाणी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वाद इतक्या टोकाला गेला कि एका महिलेनं आपल्या पतीचं डोकं विटेनं ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर ती मृतदेहावर बसली. पोलीस आल्यावर तिने पतीच्या ठेचलेल्या डोक्यातून मेंदू काढून त्यांच्यासमोर फेकला. पोलिसांकडून महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या रोजा येथील हाथोरा गावात ही घटना घडली आहे. मृत पती सत्यपाल हा स्टेडियमवर वॉचमन होता. त्याचे पत्नी सावित्रीसोबत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सत्यपालने जेवण झाल्यानंतर पत्नी सावित्रीला पाणी मागितलं. यावेळी पत्नीने त्याच्याशी भांडण सुरू केलं. दोघंही घराबाहेर आले. त्यांच्यात भांडण सुरूच होतं. दरम्यान, सावित्रीने वीट उचलून पतीच्या डोक्यावर मारली. त्यामुळे तो खाली पडला. तो मरेपर्यंत ती त्याच्या डोक्यावर वार करत राहिली. शेवटी पोलीस आले तेव्हा सावित्री आपल्या पतीच्या मृतदेहावर बसून ठेचलेल्या डोक्यातील मेंदू काढून फेकून देत होती. मोठ्या संघर्षानंतर तिला नियंत्रणात आणण्यात आले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
एएसपी सिटी संजय कुमार यांनी सांगितलं की, सत्यपालच्या लग्नाला 18 वर्षांहून अधिक काळ झाला होता. तो दारू प्यायचा, त्यामुळे त्याचं पत्नीशी अनेकदा भांडण होत असे. दोन्ही मुलं आजीसोबत काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात राहत होती. त्यांनी सांगितलं की, महिलेनं मृतदेहाला ज्या प्रकारे क्रूर वागणूक दिली होती. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचंही त्यावरून दिसतं. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.